Home अहमदनगर पतसंस्थेच्या कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

पतसंस्थेच्या कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

Farmer commits suicide due to credit union debt

Rahuri | राहुरी: राहुरी तालुक्यातील कोंढवड येथे एका शेतकर्‍याने विषारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या (Suicide) केली आहे.  नगर येथे उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. रमेश गणपत म्हसे (वय 55, रा. कोंढवड) असे मृताचे नाव आहे. एका पतसंस्थेच्या कर्जाला कंटाळून रमेश म्हसे यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याचे मृताच्या नातेवाईकांनी सांगितले.

त्यांच्यावर पतसंस्थेचे कर्ज होते. थकीत कर्जामुळे त्यांना न्यायालयाच्या नोटिसा आल्या होत्या. त्यामुळे दोन महिन्यांपासून ते तणावात होते, असे समजते.

कोंढवड येथे सोमवारी (ता. 11) दुपारी एक वाजता राहत्या घराच्या शेजारी गाईच्या गोठ्यात रमेश म्हसे यांनी विषारी किटकनाशक प्राशन केले. त्यांना उलट्या सुरू होऊन त्रास जाणवू लागल्यावर त्यांच्या पत्नी व बंधूच्या लक्षात आले. घरातील नातेवाईकांनी त्यांना तातडीने नगर येथे विळद घाटातील डॉ. विखे पाटील फाउंडेशनच्या रुग्णालयात उपचारासाठी हलविले. परंतु उपचारादरम्यान शनिवारी (ता. 16) दुपारी दीड वाजता त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा, एक भाऊ, आई-वडील असा परिवार आहे.

त्यांच्यावर पतसंस्थेचे कर्ज होते. थकीत कर्जामुळे त्यांना न्यायालयाच्या नोटिसा आल्या होत्या. त्यामुळे दोन महिन्यांपासून ते तणावात होते,असे समजते.

Web Title: Farmer commits suicide due to credit union debt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here