Home अहमदनगर Accident: उसाच्या ट्रक खाली चिरडून 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Accident: उसाच्या ट्रक खाली चिरडून 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

25-year-old man died after being crushed under a sugarcane truck Accident

Shrigonda | श्रीगोंदा: शहरातील एक तरुण आपल्या संबंधितांच्या लग्नासाठी मोटरसायकलवर बेलवंडी मार्गे ढवळगाव येथे जात असताना, रस्त्यात उक्कडगाव येथे उसाच्या ट्रकला ओव्हर ट्रेक करून पुढे जाताना समोरून अचानक आलेल्या वाहनाला धडक झाल्याने अपघात घडला. . ही घटना दिनांक 17 एप्रिल 2022 रोजी उक्कडगाव येथील चढावर घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. शहरातील गणपती मळा येथील रहिवासी असलेला सचिन मच्छिंद्र गाडे असे या तरुणाचे नाव आहे.

सचिन उसाच्या ट्रक खाली पडला व दुर्दैवाने ट्रकखाली चिरडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सचिन गाडे हा नियोजित लग्नासाठी ढवळगाव येथे मोटारसायकल वर जाताना रस्त्यात उक्कडगाव येथे एक ट्रक त्याच्यासमोर चढावर चालली होती. वेग वाढवून तो त्या ट्रकला ओव्हर ट्रेक करण्याचा प्रयत्न करत असतानाच समोरून अचानक एक वाहन आले व सचिनला धडक दिली. सचिन थेट ट्रकच्या मागील चाकाखाली पडला.

त्याच्या सोबत मोटरसायकल वर मागे असलेला एक जण सुदैवाने अपघातातून बचावला आहे. तर, कंबरेपासून डोक्यापर्यंत सचिनच्या देहाचा पूर्ण चुराडा झालायं. विशेषतः सचिनच्या मागे बसलेल्या इसमाने सचिनला रस्त्यात नुकतीच लिफ्ट मागितली होती. या घटनेनंतर बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सचिनचे शव ताब्यात घेत, शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. घटनेच्या अनुषंगाने भादवि कलम 304 अ व इतर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

Web Title: 25-year-old man died after being crushed under a sugarcane truck Accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here