Home Accident News अहमदनगर ब्रेकिंग: घाटात झालेल्या भीषण अपघातात, दोन ठार एक जखमी

अहमदनगर ब्रेकिंग: घाटात झालेल्या भीषण अपघातात, दोन ठार एक जखमी

Two killed, one injured in road mishap Accident

Ahmednagar | अहमदनगर: अहमदनगर-पुणे महामार्गावरील चास-कामरगाव घाटात टेम्पोला कारची पाठीमागून जोरदार धडक बसल्याने भीषण अपघातात (Accident) अहमदनगर शहरातील दोन जण ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.  रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

अहमदनगरमधील प्रसिध्द मुर्तीकार बबन ऊर्फ लक्ष्मण दत्तात्रय गोसके (वय ६२ रा. बागरोजा हडको) व महापालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी प्रकाश रंगनाथ गोरे यांचा मृत्यू झाला

तर महापालिकेतील वाहन चालक प्रशांत प्रकाश पवार हे जखमी झाले असून त्यांच्यावर अहमदनगर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पारनेर तालुक्यातील वाळवणे येथील भैरवनाथ यात्रेवरून अहमदनगरकडे परतत असताना चास- कामरगाव घाटात समोर चाललेल्या टेम्पोला कारची पाठीमागून जोरदार धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला. कारमधील दोघांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास नगर तालुका पोलीस करत आहेत.

Web Title: Two killed, one injured in road mishap Accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here