Home बीड Accident | पिकअप अंगावरून गेल्याने शेतकऱ्याचा चिरडून मृत्यू

Accident | पिकअप अंगावरून गेल्याने शेतकऱ्याचा चिरडून मृत्यू

Farmer crushed to death by pickup Accident

बीड | Beed Accident:  पिकअप पाठीमागे घेत असताना एका 60 वर्षीय शेतकऱ्यास जोराची धडक देत अंगावरून गेल्याने, या अपघातात (Accident) शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. हा अपघात बीडच्या मस्साजोग गावात घडला आहे. गंगाधर भानुदास कदम वय 60 रा. मस्साजोग ता. केज असं मयत शेतकऱ्याच नाव आहे.

बीडच्या केज तालुक्यात असणाऱ्या मस्साजोग येथील शेतकरी, गंगाधर भानुदास कदम, हे शेतातून गावात येत होते. ते रस्त्यावर आले असता कोंबड्यानी भरलेल्या पिकअपने, रिव्हर्स घेताना, गंगाधर कदम यांना जोराची धडक दिली, यावेळी ते खाली पडले. मात्र चालकाने याकडं लक्ष न देता अन पाठीमागे न पाहून अंगावरून पिकअप घातले.

या अपघातात गंभीर झालेल्या शेतकरी गंगाधर कदम यांना, तातडीने अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र काही मिनिटात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू (Death) झाला. दरम्यान, मुलगा अशोक गंगाधर कदम यांच्या फिर्यादीवरून पिकअप चालकाविरुद्ध केज पोलिसात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. पिकअप चालक फरार झाला आहे.

Web Title: Farmer crushed to death by pickup Accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here