Home संगमनेर संगमनेर ब्रेकिंग: शेततळ्यात बुडून सख्या बहीण- भावाचा दुर्दैवी मृत्यू

संगमनेर ब्रेकिंग: शेततळ्यात बुडून सख्या बहीण- भावाचा दुर्दैवी मृत्यू

Sangamner Sister-in-law drowned in farm, unfortunate death of brother

Sangamner | संगमनेर: संगमनेर तालुक्यातील पठारभागात आज दुर्दैवी घटना घडली आहे. शेततळ्यात बुडून (Drowned) सख्या बहीण- भावाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील मोधळवाडी गावांतर्गत असलेल्या घाणेवस्ती येथे रविवारी सकाळी घडली आहे.

जयश्री बबन शिंदे वय ( वर्षै २१) व आयुष बबन शिंदे वय ( ७) असे बहीण- भावाचे नाव आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, पिंपळगाव देपा गावांतर्गत असलेल्या मोधळवाडीतील घाणेवस्ती येथे बबन चांगदेव शिंदे हे आपल्या कुटुंबासमवेत राहात आहे. रविवारी सकाळी मुलगी जयश्री व मुलगा आयुष हे दोघे बहीण- भाऊ धुणे धुण्यासाठी आपल्याच शेतात असलेल्या शेततळ्यावर गेले होते आयुष हा शेततळ्यातून पाणी काढत असताना पाय घसरून  तो शेततळ्यात पडला त्यामुळे त्याला वाचवण्यासाठी बहीण जयश्री हिने शेततळ्यात उडी मारली मात्र दोघेही शेततळ्यातील पाण्यात बुडाले. बहीण – भाऊ शेततळ्यात बुडाल्याची माहिती समजताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांनाही शेततळ्यातून बाहेर काढण्यात आले पण त्या अगोदरच बहीण- भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेर कुटीर रूग्णालयात नेण्यात आले आहे. बहिण भावाच्या दुर्दैवी मृत्यूने पठार भागावर शोककळा पसरली आहे.  

Web Title: Sangamner Sister-in-law drowned in farm, unfortunate death of brother

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here