Home महाराष्ट्र Accident:  बसचा घाटात भीषण अपघात, दोन ठार , २० जखमी

Accident:  बसचा घाटात भीषण अपघात, दोन ठार , २० जखमी

Two killed, 20 injured in bus mishap Accident

रायगड:  गावी निघालेल्या खासगी बसचा रस्त्यात  घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात (Accident) झाला आहे. रायगड जिल्‍हयात माणगाव ते श्रीवर्धन मार्गावर घोणसे घाटात भीषण अपघात झाला. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून 20 प्रवासी जखमी झाले आहेत.

या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मुंबई नालासोपारा इथून प्रवासी घेवून बोर्ली – श्रीवर्धनकडे निघालेल्‍या खाजगी बसला हा अपघात झाल्याची माहिती मिळाली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सकाळी 8.30 च्या सुमारास घोणसे घाटात अवघड वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्‍याने हा अपघात झाल्याची माहिती मिळाली. पोलीस आणि स्‍थानिकांनी मदत कार्य सुरू केले आहे. जखमींना म्‍हसळा येथील उपजिल्‍हा रूग्‍णालयात उपचारासाठी हलवण्‍यात आले आहे असून उपचार सुरु आहेत.

Web Title: Two killed, 20 injured in bus mishap Accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here