Home महाराष्ट्र नवनीत राणांना डिस्चार्ज मिळताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खुल आव्हान..Navneet Rana

नवनीत राणांना डिस्चार्ज मिळताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खुल आव्हान..Navneet Rana

 

Navneet Rana gets discharge, open challenge to Chief Minister Uddhav Thackeray news

मुंबई: लीलावती रुग्णालायतून डिस्चार्ज मिळताच अमरावती खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. तुमच्यात जर दम असेल तर महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातून माझ्याविरोधात निवडणूक लढवून दाखवा असं खुलं आव्हान त्यांनी उद्धव ठाकरेंना दिले. मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यावर आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे, त्यांच्यात जर दम असेल तर त्यांनी महाराष्ट्रातून कुठूनही माझ्या विरोधात निवडणूक लढवावी आणि जिंकून दाखवावी. राज्यातील कोणताही जिल्हा निवडा, मी तुमच्या विरोधात उभी राहील. नारी शक्ती काय असते हे मी त्यांना दाखवून देईन. महाराष्ट्रातील जनताच तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल असा इशारा नवनीत राणा यांनी दिला.

लोकांसमोर येऊन तुम्ही निवडणूक लढवून दाखवां.महिलेची ताकद काय आहे हे मी तुम्हाला दाखवून देईन त्यांनी माझ्या विरोधात निवडून येऊन दाखवावे असे आव्हान नवनीत राणा यांनी केलं आहे.

मी मुंबईची मुलगी आहे. मुंबईत दोन पिढ्यांपासून सत्ता आहे त्यांच्याविरोधात मी येत्या महापालिका निवडणुकीत प्रचार करणार आहे. मुंबईत जे रामभक्त आहेत त्यांच्या प्रचारासाठी मी रस्त्यावर राहून प्रचार करणार आहे असे नवनीत राणा यांनी म्हंटले आहे.

Web Title: Navneet Rana gets discharge, open challenge to Chief Minister Uddhav Thackeray

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here