Home जळगाव महाविद्यालयीन विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत अत्याचार आणि पैसे उकळले

महाविद्यालयीन विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत अत्याचार आणि पैसे उकळले

Abuse a college student into a love trap

यावल | जळगाव: यावल येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनीला शहरातील एका तरुणाने प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार (Abuse) केला आणि तिच्याकडून पैसे देखील उकळले. याप्रकरणी जळगाव  रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

याबाबत या पीडित तरुणीने जळगाव शहरातील रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. ५) फिर्याद दिली असून  विशाल राजेश तडवी (वय २३) या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल येथील विशाल राजेश तडवी (वय २३) या तरुणाने जळगावात महाविद्यालय शिक्षण घेत असलेल्या यावलमधील एका विद्यार्थिनीशी ओळख निर्माण केली. तिच्यासोबत प्रेमसंबंध प्रस्थापित केले. तिला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला. यासाठी तरुणाने जळगाव शहरातील संभाजीनगरात भाडेतत्त्वावर फ्लॅट घेतला होता. त्यात २८ ऑक्टोबर २०१८ ते आजपर्यंत वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केला आणि तिच्याकडे पैशाची मागणी केली. तरुणीने पैसे देण्यास नकार दिला असता तिला शिवीगाळ करून मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

Web Title: Abuse a college student into a love trap

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here