Home नंदुरबार Murder: प्रेमसंबंधात तरुणीने लग्नास नकार दिल्याने गळा दाबून खून, आरोपी अटकेत

Murder: प्रेमसंबंधात तरुणीने लग्नास नकार दिल्याने गळा दाबून खून, आरोपी अटकेत

Murder by strangulation after a young woman refuses to marry

नंदुरबार | Nandurbar Crime: सहा दिवसांपुर्वी कुंडल येथील ललिता हिचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती.  शवविच्‍छेदनानंतर तिचा खून झाल्‍याचे समोर आल्याने  पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत तपासात  मुंदलवड येथील इसमास युवतीने लग्‍नास नकार दिल्‍याने तिचा खून (Murder) केल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. या आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान पोलिसांनी ललिताच्या मोबाईलवर आलेल्या कॉलनुसार तपास सुरू केला होता. यात ललिताच्या बहिणीचा नवरा यांचादेखील फोन आलेला असल्याने सुरुवातीला त्याची चौकशी करून त्यांची झाडाझडती घेतली. परंतु पोलिसांना किल्षट मिळाले नसल्यामुळे सोमाना येथील दोन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यात एका तरुणाचे ललिताशी प्रेमसंबंध असल्याचे निष्पन्न झाले होते. परंतु सदर तरुणांच्या तपासात ललिताचा खून त्यांनी केला नसल्याचे उघड झाले होते.

पाचव्या दिवशी धडगाव पोलिसांच्या पथकाला गुप्त बातमीदारांमार्फत ललिताचा खून झालेल्या रात्री मुंदलवड येथील मनोज भिमसिंग वळवी या इसमाशी असल्याचे कळल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. मोहन याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने संपूर्ण कहाणी कथन केली.

मोहन हा विवाहित असून देखील ललिताशी त्याचे संबंध होते व लग्नासाठी आग्रह धरत होता. परंतु ललिताने नकार दिल्यामुळे मनोजने ललिताला ओढणीच्या साह्याने गळा दाबून खून (Murder) केला असल्याचे तपासात उघड झाले आहे. संशयित आरोपी मनोज याला पोलिसांनी अटक (Arrested) केली असून अधिक तपास सुरू आहे.

प्रभारी पोलिस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली धडगाव पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पथकांनी ही कारवाई केली आहे.

Web Title: Murder by strangulation after a young woman refuses to marry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here