Home अहमदनगर अहमदनगर: रोटा मारत असताना ट्रॅक्टर उलटून शेतकऱ्याचा मृत्यू

अहमदनगर: रोटा मारत असताना ट्रॅक्टर उलटून शेतकऱ्याचा मृत्यू

Breaking News | Ahmednagar: ट्रॅक्टर उलटून शेतकरी ट्रॅक्टरखाली दबून जागेवर ठार झाल्याची घटना.

farmer died after his tractor overturned while doing rota

राहुरी: ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतात रोटाव्हेटर मारत असताना ट्रॅक्टर उलटून शेतकरी ट्रॅक्टरखाली दबून जागेवर ठार झाला. ही घटना राहुरी तालुक्यातील दरडगाव थडी येथे ६ मे रोजी सकाळी घडली. संजय सीताराम जाधव (वय ४३) ता. दरडगावथडी यांची मुळा नदीकाठी शेतजमीन आहे. संजय जाधव हे सकाळी १०.३० वाजे दरम्यान त्यांच्या शेतात ट्रॅक्टरच्या सहाय्याने मारीत होते. यावेळी ट्रॅक्टरचे चाक बांधावर जाऊन ट्रॅक्टर उलटला आणि संजय जाधव हा शेतकरी ट्रॅक्टर खाली दबला गेला. तेव्हा परिसरातील मच्छिंद्र जाधव, बाबुराव दोंदे, बापूसाहेब रोकडे, संदीप जाधव, मधुकर जाधव यांच्यासह अनेक तरुणांनी तात्काळ मदतकार्य करून जेसीबीच्या सहाय्याने ट्रॅक्टर उचलला आणि संजय जाधव या शेतकऱ्याला बाहेर काढले.

जाधव यांना तात्काळ राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र, वैद्यकीय अधिकारी आंबरे यांनी संजय जाधव यांना तपासून पूर्वीच मयत घोषित केले. उपचारा संजय जाधव यांचे मित्र व नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात गर्दी केली होती. दुपारी उशिरापर्यंत संजय जाधव यांचे शवविच्छेदन सुरू होते. संजय जाधव यांच्या अपघाती निधनाने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत राहरी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Web Title: farmer died after his tractor overturned while doing rota

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here