Home अहमदनगर अहमदनगर: पाय घसरून पाण्यात पडल्याने मुलीचा मृत्यू

अहमदनगर: पाय घसरून पाण्यात पडल्याने मुलीचा मृत्यू

Breaking News | Ahmednagar: १० वर्षीय मुलीचा पाय घसरून पाण्यात पडून मृत्यू झाल्याची घटना.

Girl dies after falling into water

जामखेड: खर्डा (ता. जामखेड) येथील सानिका ज्ञानेश्वर काशीद (१०) या मुलीचे ऐतिहासिक ओंकारेश्वर मंदिरासमोरील शुक्रवार पेठ बारवेत पाय घसरून पाण्यात पडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.४) दुपारी तीनच्या सुमारास घडली.

याबाबत मुलीचे वडील ज्ञानेश्वर हरिभाऊ काशीद यांनी पोलीस ठाण्यात खबर दिली. शनिवारी (दि.४) दुपारी ३ वाजता ज्ञानेश्वर काशीद व मुलगी सानिका दोघे जण बारवेत पोहत होते. त्यानंतर तिचे वडील कामानिमित्त गावात आले. परंतु, मुलगी सानिका ही ऑकारेश्वर मंदिरासमोरील पुरातन काळातील बारवात पुन्हा पोहत होती.

ती वरती येऊन पोहण्यासाठी उडी मारताना तिचा दगडी पायऱ्याला शेवाळ असल्यामुळे पाय घसरला. ती खालील दगडी पायरीवर पडल्याने तिच्या डोक्याला मार लागून ती पाण्यात पडून बुडाली. या प्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास खर्डा पोलीस करत आहेत.

Web Title: Girl dies after falling into water

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here