Home अहमदनगर अहमदनगर: विजेचा शॉक बसून शेतकऱ्याचा मृत्यू

अहमदनगर: विजेचा शॉक बसून शेतकऱ्याचा मृत्यू

Parner: विजेचा शॉक (Electric Shock)बसून शेतकऱ्याचा मृत्यू.

Farmer dies due to electric shock

पारनेर: पारनेर तालुक्यातील निघोज येथील सागर पांडुरंग लामखडे वय २८ या तरुण शेतकऱ्याला विजेचा शॉक बसून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. कुपनलिका सुरु करण्यासाठी गेलेल्या या तरुणाचा विजेच्या शॉकने अकाली मृत्यू झाला आहे. मंगळवारी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास हि घटना घडली.

सागर यास विजेचा शॉक बसल्यानंतर त्याच्या घरातील सदस्यांनी त्याला तात्काळ शिरूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेले होते. मात्र उपचार सुरू करण्यापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. सागर हा होतकरू तरूण होता. निघोजमध्ये एक हॉटेल चालवून तो व्यवसायात आपले करीअर करण्याचे स्वप्न पहात होता.

व्यवसायात स्थिरावत असतानाच दुर्देवाने ही दुर्घटना घडली व त्यात त्याचे अकाली निधन झाले. सागर याचा मोठा मित्र परीवार या धक्कादायक वृत्तानंतर शोककळा पसरली आहे.  

Web Title: Farmer dies due to electric shock

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here