Home Accident News Accident: दोन दुचाकींत अपघात, एक ठार, दोन जखमी

Accident: दोन दुचाकींत अपघात, एक ठार, दोन जखमी

Shrirampur Accident: दुचाकीस्वरांचा भीषण अपघात झाला. या अपघातात एक जण ठार झाला तर दोन जण जखमी.

Two-wheeler accident, one killed, two injured

श्रीरामपूर: श्रीरामपूर परिसरात नेवासा रोडवरील हॉटेल गझलसमोर दोन दुचाकीस्वरांचा भीषण अपघात झाला. या अपघातात एक जण ठार झाला तर दोन जण जखमी झाले आहे. आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.

यामध्ये दुचाकीवर श्रीरामपूर (Shrirampur) येथील सरस्वती कॉलनीतील स्वयंवर मंगल कार्यालयाशेजारी असलेले राजेंद्र मारुती बोरुडे यांचा व कोपरगाव तालुक्यातील (Kopargav) धोत्रे भोजडे येथील गणेश भाऊसाहेब पिंपळे व यांच्यासोबत असलेल्या यमुनाबाई पुंजाहारी मुळे (रा. नेवासा रोड, नाक्यासमोर, श्रीरामपूर) यांच्यात हा अपघात (Accident) झाला. अपघातात राजेंद्र बोरुडे (वय 52) यांच्या डोक्याला गंभीर (Injured) मार लागल्याने त्यांना नागरिकांनी तात्काळ औषध उपचारासाठी येथील कामगार रुग्णालयात हलविले. परंतू वैद्यकीय उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू (Death) झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी घोषित केले.

मयत राजेंद्र मारुती बोरुडे यांच्याकडे प्लेटिना क्र. एम. एच. 17 सीके 8105 या क्रमांकाचे तर जखमी गणेश भाऊसाहेब पिंपळे यांच्याकडे सीडी डीलक्स क्र. एम. एच. 17 सीके 7717 या क्रमांकाचे दुचाकी वाहन होते. अपघातात दोन्ही वाहनाचे नुकसान झाले. अपघातात गणेश भाऊसाहेब पिंपळे (वय 35) व यमुनाबाई पुंजाहारी मुळे (वय 65) हे जखमी झाले असून यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती नागरिकांनी शहर पोलीस ठाणे यांना कळविली. त्यावरून पोलीस हवालदार संतोष परदेशी, पोलीस नाईक अमोल गायकवाड, पोलिस नाईक किरण पवार, यांनी घटनास्थळी भेट देत वाहतूक सुरळीत केली. अपघातग्रस्त व्यक्तींना नागरिकांच्या मदतीने येथील साखर कामगार रुग्णालय येथे उपचारासाठी हलविण्यात आले. यावेळी अपघातस्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.

Web Title: Two-wheeler accident, one killed, two injured

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here