Home अकोले अकोले ब्रेकिंग: शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू, अचानक जोरदार वादळवाऱ्यासह पाऊस अन

अकोले ब्रेकिंग: शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू, अचानक जोरदार वादळवाऱ्यासह पाऊस अन

Akole Breaking: म्हाळादेवी येथील शेतकऱ्याचा वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना.

Farmer dies due to lightning Strike

अकोले:  तालुक्यातील म्हाळादेवी येथील शेतकऱ्याचा वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली. रामदास लक्ष्मण उघडे (वय-56) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेत एक शेळीही दगावली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज दुपारच्या वेळी अकोले तालुक्यातील अनेक ठिकाणी वादळ वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. या जोरदार वादळी वाऱ्यात अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या. रामदास लक्ष्मण उघडे हे आपल्या शेळ्या चारण्यास म्हाळादेवी गावच्या वाडा शिवारात गेले होते.

दुपारी अचानक जोरदार वादळवाऱ्यासह पाऊस पडला. यावेळी अचानकपणे त्याच्या अंगावर वीज कोसळली. या घटनेत ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने स्थानिकांनी अकोले ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. या घटनेत एक शेळीही मृत्युमुखी पडली आहे.

गरीब आदिवासी शेतकऱ्याचा वीज पडून झालेल्या दुदैवी मृत्यू बद्दल म्हाळादेवी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान मयत रामदास उघडे याच्या कुटुंबियांना तातडीने शासकीय मदत मिळावी अशी मागणी म्हाळादेवी येथील खंडेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व माजी सरपंच प्रदिप हासे यांनी केली आहे.

Web Title: Farmer dies due to lightning Strike

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here