Home Accident News संगमनेर:  नाशिक पुणे महामार्गावर ट्रक आणि कारचा भीषण अपघात, तरुण ठार

संगमनेर:  नाशिक पुणे महामार्गावर ट्रक आणि कारचा भीषण अपघात, तरुण ठार

Sangamner News: पठार भागातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील आंबीखालसाफाटा परीसरात झालेल्या अपघातात (Accident) एक जण ठार झाल्याची घटना.

accident involving truck and car on Nashik Pune highway, youth killed

संगमनेर:  तालुक्याच्या पठार भागातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील आंबीखालसाफाटा परीसरात झालेल्या ट्रक आणि कारचा भीषण अपघातात एक जण ठार झाल्याची घटना शनिवार रात्री साडेदहा ते अकरा वाजेच्या दरम्यान घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ट्रक क्रमांक Rj 14 GK 2050 हा पुण्याकडून नाशिकच्या दिशेने चालला होता तो शनिवारी रात्री साडेदहा ते अकरा वाजेच्या दरम्यान आंबीखालसा फाटा परीसरात आला असता त्याच दरम्यान पाठीमागून भरधाव वेगाने आलेली कार क्रमांक (mh 17 ac 197) हीच्या वरील चालक आनंद सुनिल भाटेवरा यांचे कारवरील नियंत्रण सुटल्याने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात आनंद सुनिल भाटेवरा (वय २३) राहणार कोल्हार तालुका राहता जिल्हा अहमदनगर हा गंभीर जखमी झाला.

दरम्यान घटनेची माहिती समजताच आजुबाजूच्या नागरीकांनी धाव घेत भाटेवरा यास खाजगी रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालय संगमनेर येथे पाठवून दिले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करत त्यास मृत घोषित केले. याप्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या खबरीवरुन घारगांव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार राजू खेडकर हे करत आहेत.

Web Title: accident involving truck and car on Nashik Pune highway, youth killed

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here