Home अहमदनगर धक्कादायक! कांदा नाकारल्याने शेतकऱ्याने केला आत्महत्येचा प्रयत्न

धक्कादायक! कांदा नाकारल्याने शेतकऱ्याने केला आत्महत्येचा प्रयत्न

farmer tried to commit suicide by refusing the onion

Shrirampur | श्रीरामपूर: नगर जिल्ह्यातील शेतकरी अगोदरच उसामुळे हतबल झाले असताना कांद्याचे भाव (Onion price) दिवसेंदिवस कोसळत असल्याने शेतकरी चिंतेत अडकला आहे.

अशातच विक्रीसाठी आणलेला कांदा नाकारण्यात आल्याने एका शेतकऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न (Attempt to commit suicide) केला. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टाकळीभान उपबाजारात कांदा बाजार सुरू आहे. काल रविवारी गुजरवाडी येथील शेतकरी भरत जाधव यांनी आपला कांदा उपबाजारात विक्रीसाठी आणला होता.

तीन आडत्यांकडे कांदा विक्रीस लावला होता. कांदा लिलावासाठी आणला होता. लिलावाचा अधिकृत दिवस नसल्याने त्यांच्या नेहमीच्या आडतीवर वक्कलातील कांदा गोणी फोडली असता तो माल नो बीट झाला.

बाकीच्या आडतीवरील लिलाव मंगळवारी होणार होते. मात्र एका आडतीवरील कांदा नो बीट झाल्याने हतबल होऊन जाधव यांनी काही वेळाने विषारी पदार्थाची बाटली आणून उपबाजार विषारी पदार्थ प्राशन केल्याचा प्रकार घडला. बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने जाधव यांना श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

Web Title: farmer tried to commit suicide by refusing the onion

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here