Home क्राईम संगमनेर: जमीन विकण्यासाठी आलेला शेतकरी खरेदीखतासह १५ लाख घेऊन फरार

संगमनेर: जमीन विकण्यासाठी आलेला शेतकरी खरेदीखतासह १५ लाख घेऊन फरार

Sangamner Crime:   जमीन विकत – घेणाऱ्या शेतकऱ्याकडून आगाऊ रक्कम घेऊन सहायक दुय्यम उपनिबंधक कार्यालयातून पळ काढून पंधरा लाखांची फसवणूक केल्याची घटना.

farmer who came to sell the land absconded with 15 lakhs along with the purchase money crime filed

संगमनेर:  जमीन विकत – घेणाऱ्या शेतकऱ्याकडून आगाऊ रक्कम घेऊन सहायक दुय्यम उपनिबंधक कार्यालयातून पळ काढून पंधरा लाखांची फसवणूक केल्याची घटना संगमनेर तालुक्यात घडली. पीडित शेतकऱ्याची पोलिसांत फिर्याद नोंदवून न घेतल्याने शेवटी न्यायालयात मागितल्याने न्यायालयाच्या आदेशाने संगमनेर पोलिसांतील दोघांविरुद्ध दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सचिन भास्कर गिते (रा. पिंपरीलौकी, अजमपूर ता. संगमनेर) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली असून, त्यानुसार सर्वजण अमोल रामदास गिते आणि रामदास लक्ष्मण गिते बोल्हेगाव रोड, नागापूर, नगर) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी आणि फिर्यादी दोघांचेही पिंपरी लौकी गावांमध्ये शेती आहे. आरोपींनी त्यांची शेतजमीन विक्रीस काढल्याची माहिती फिर्यादीना मिळाली त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये खरेदीची चर्चा होऊन जमिनीसाठी १५ लाख रुपयाची रक्कम देण्याचा व्यवहार निश्चित झाला. त्यानुसार फिर्यादीने त्यांना सुरुवातीला ५ लाख रुपये विसार  म्हणून पिंपरीलौकी, अजमपूर या ठिकाणी दिले आणि खरेदीखत करण्याचे ठरले. त्यानुसार संगमनेर येथे खरेदीखत लिहून घेण्यात आले. खरेदी दस्त नोंदविण्यासाठी सहायक दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयात दिले होते. आरोपींनी उर्वरित रक्कम मागितल्याने फिर्यादींनी रोख रक्कम दिली.

परंतु नोंदणी कार्यालयातील नेटचे सर्व्हर बंद पडल्यामुळे खरेदीखताचा दस्त दुसऱ्या दिवशी नोंदणी करण्याचे ठरले. त्यामुळे आरोपींना संपूर्ण रक्कम मिळाली. त्यानंतर ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सर्वजण नोंदणी कार्यालयामध्ये गेले. सदरचा दस्त नोंद करण्यासाठी ठेवलेला असताना आरोपींनी नजर चुकवत मूळ खरेदीखताचा दस्त घेऊन तिथून पळ काढला. आरोपी कागदपत्रांसह गायब झाले असल्याचे फिर्यादींना समजले. त्यानंतर आपली १५ लाख रुपयांची फसवणूक झाली असल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. फिर्यादीने संगमनेर पोलिसांत धाव घेतली पण पोलसांनी तक्रार नोंदवून घेतली नाही. मग त्यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली होती.

Web Title: the farmer who came to sell the land absconded with 15 lakhs along with the purchase money crime filed

See Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here