Home क्राईम संगमनेर: महिलेस लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत विनयभंग

संगमनेर: महिलेस लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत विनयभंग

Sangamner Crime: मनोली (Manoli) येथे महिलेचा विनयभंग (Molesting) करत तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी.

Beating women with kicks and molesting them

संगमनेर :- संगमनेर तालुक्यातील मनोली येथे महिलेचा विनयभंग करत तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत तालुका पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी महिला मनोली येथे राहात आहे. तिला पाणी भरण्याच्या कारणावरून शिवीगाळ केली त्याच दरम्यान महिलेने शिव्या का देतो असे विचारले असता सचिन देवराम पवार याने महिलेच्या अंगाला झटून तिचा विनयभंग केला. त्यानंतर शिवाजी बाळू पवार व जन्याबापू बाळू पवार यांनी महिलेस काठीने मारले. त्यानंतर राहुल जन्याबापू पवार, अजय जन्याबापू पवार, समीर शिवाजी पवार, सागर शिवाजी पवार, सुमन शिवाजी पवार, मिना शिवाजी पवार या वरील सर्वांनी एकत्र येऊन महिलेस शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी  महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार एल. एम. औटी करत आहेत.

Web Title: Beating women with kicks and molesting them

See Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here