Home अहमदनगर अहमदनगर: शेततळ्यात बुडून शेतकऱ्याचा मृत्यू

अहमदनगर: शेततळ्यात बुडून शेतकऱ्याचा मृत्यू

Ahmednagar | Shevgaon News: पाय घसरल्याने शेततळ्यात बुडून (Drowned) शेतकऱ्याचा मृत्यू.

Farmer's death due to drowned in farm

अहमदनगर | शेवगाव: तालुक्यातील वडुले बु येथे दुर्दैवी घटना घडली आहे.  पाय घसरल्याने शेततळ्यात बुडून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना वडुले बु येथे (दि.७) दुपारी दोन वाजेच्या  सुमारास घडली.

अण्णासाहेब मोहन बुचकुल (वय ५८, रा. वडुले बु) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, अण्णासाहेब बुचकुल हे आपल्या शेतातील शेततळ्यातून पाणी काढत होते. यावेळी त्यांचा पाय घसल्याने ते पाण्यात पडले. अण्णासाहेब यांना पोहता येत असल्याने ते पाण्याच्या बाहेर येण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, शेततळ्याच्या भिंतीवर पसरलेल्या पाणकापडावरून त्यांचा पाय घसरून ते पाण्यात बुडाले असावेत, असा अंदाज वर्तवला जात आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Farmer’s death due to drowned in farm

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here