Home अहमदनगर अहमदनगर हादरलं! ५ वर्षीय मुलाची हत्या करून बापाची आत्महत्या, पत्नीलाही….

अहमदनगर हादरलं! ५ वर्षीय मुलाची हत्या करून बापाची आत्महत्या, पत्नीलाही….

Ahmednagar Crime News:  बापाने आपल्या मुलाची हत्या करून आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.

Father commits suicide by killing 5-year-old son

पारनेर: अहमदनगर जिल्ह्यातील धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. पारनेर तालुक्यातुन एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका बापाने आपल्या मुलाची हत्या करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तसेच बायकोलाही जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेने तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत पारनेर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष रासकर (पिपळगाव रोठा) हा त्याची पत्नी, मुलगा आदर्श व एक मुलगी यांच्यासह राहत होता. संतोष रासकर यास दारूचे व्यसन होते. तो चालक म्हणून खाजगी वाहनावर काम करत होता. मंगळवारी (दि 28) रोजी संतोष व त्याच्या पत्नीचे दुपारच्या सुमारास घरगुती कारणावरून अज्ञात कारणावरून भांडण सुरू झाले.

त्यामध्ये संतोषच्या मारहाणीत पत्नी जखमी झाली तसेच मुलगा आदर्श याच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने तो जागेवरच मयत झाला. सुजाताला डोक्यात मुका मार लागल्याने ती जागेवर बेशुद्ध पडली. त्यावेळी संतोष यास दोघीही मयत झालेत असे वाटू लागल्याने त्याने घराच्या लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेऊन स्वतः आत्महत्या करून घेतली.

या घटनेतील आरोपीची पत्नी जबर जखमी असुन त्याच्या माहिती अंती पुढील घटनाक्रम कळेल अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान या घटनेने पारनेर तालुका हादरुन गेला असुन ऐवढी टोकाची भुमिका घेण्यामागे काय कारण असावे याचा तपास पोलिस करत आहेत . पारनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपो नी. विजय ठाकूर करीत आहेत.

Web Title: Father commits suicide by killing 5-year-old son

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here