Home क्राईम आठ वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार, घरी बोलावून धक्कादायक कृत्य

आठ वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार, घरी बोलावून धक्कादायक कृत्य

Pune Crime: गेम खेळण्यासाठी घरी बोलावून आठ वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार (Unnatural Abuse) करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार.

Unnatural abuse of an 8-year-old child FIR in Lonikand Police Station

पुणे: गेम खेळण्यासाठी घरी बोलावून आठ वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार  करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी मुलाच्या वडिलांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात  फिर्याद (गु. रजि. नं. २३६/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी माऊली रामभाऊ अडागळे (रा. वाघोली) याच्यावर गुन्हा  दाखल केला आहे. ही घटना ८ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींना ८ वर्षाचा मुलगा आहे. माऊली याने त्याला गेम खेळण्यासाठी रुममध्ये घेऊन गेला. गेम खेळण्याचा बहाणा करुन हा गेमचाच एक भाग आहे, असे सांगून त्याला कपडे काढायला सांगितले व त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. ही बाब त्याने आता वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी तक्रार दिली असून पोलीस उपनिरीक्षक लिंगे तपास करीत आहेत.

Web Title : Unnatural abuse of an 8-year-old child FIR in Lonikand Police Station

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here