Home अहमदनगर बापानेच केला मुलीवर लैंगिक अत्याचार  

बापानेच केला मुलीवर लैंगिक अत्याचार  

father himself sexually abused the girl

श्रीरामपूर: श्रीरामपूर तालुक्यातील निमगाव खैरी येथे २७ वर्षीय जन्मदात्या पित्याने १० वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

याबाबत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून बापाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील निमगाव खैरी शिवारात एक परप्रांतीय २७ वर्षाचा गृहस्थ आपल्या २५ वर्षीय पत्नी व १० वर्षीय मुलीसह एका पोल्ट्री फार्मवर काम करतात. शुक्रवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास पोल्ट्री फार्मच्या ठिकाणी असलेल्या घरांमध्ये सर्व कुटुंब असताना २७ वर्षीय बापाने १० वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला. याबाबत मुलीच्या आईने शनिवारी वडिलांविरुद्ध व स्वतः च्या पतीविरुद्ध श्रीरामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल दाखल करण्यात आला. आरोपीस तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे.

Web Title: father himself sexually abused the girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here