Home अकोले Akole: अकोले तालुक्यात २५ एकर क्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी

Akole: अकोले तालुक्यात २५ एकर क्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी

Fire on 25 acres in Akole taluka

अकोले | Akole: अकोले तालुक्यातील कौठवाडी शिवारात २५ एकर शिवाराला आग लागून प्रचंड नुकसान झाल्याची घटना घडली आहे. या आगीमध्ये विविध झाडे, सरपटनारे प्राणी, चाऱ्याच्या पेंड्याचे मोठे नुकसान झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कौठवाडी येथील काशिनाथ साबळे व शंकर साबळे हे घरी नसताना अचानक सकाळच्या सुमारास २५ एकर शिवारात आग लागली. या आगीत आंबा, काजू, जांभूळ, बदाम, चिकू आदी १०० झाडे जळून गेली आहेत.

साबळे यांच्या खळ्यावर असणारे २५० पेंडेचा चारा जळून खाक झाला आहे. आग लागल्याचे समजताच इंदिरा साबळे यांनी आरडाओरडा केला. त्यांनी व त्यांच्या मुलाने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र मोठे नुकसान या कुटुंबाचे झाले आहे. अज्ञात व्यक्तीने ही आग लावल्याची तक्रार शंकर साबळे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी जे.डी. गोंदके व सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्याकडे करण्यात आली.  

Web Title: Fire on 25 acres in Akole taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here