Home अकोले अकोले तालुक्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा यासाठी आंदोलन

अकोले तालुक्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा यासाठी आंदोलन

agitation for the resignation of Minister Anil Deshmukh

अकोले:  महाविकास आघाडीकडून गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh)यांना पाठीशी घालण्याचे काम करीत आहेत. यासाठी संगमनेर व अकोले तालुक्यात भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आली.

खंडणीखोर महाविकास आघाडी सरकार खंडणी गोळा करण्यासाठी पोलिस दलाचा गैरवापर करत आहे हे आज पोलीस अधिकार्यांकडुन उघड झाले आहे, महिलांची असुरक्षितता, निष्पाप साधुसंताची हत्या,  शेतकऱ्यांकडुन विजबिलाची पठाणी वसुली, विज कनेक्शन तोडणी, भ्रष्ट मंत्री,  भ्रष्ट अधिकारी हे सरकार पाठिशी घालत आहे, सरकारी कारभाराचा निषेध करण्यासाठी व गृह मंत्री अनिल देशमुख यांनी महिन्याला 100 कोटी वसुलीची मागणी केली असा आरोप, पोलीस महासंचालक परमवीर सिंह यांनी केला ,त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा या सर्व मागणीसाठी कोरोना चे सर्व नियम पाळून भारतीय जनता पार्टी अकोले तालुक्याच्या वतीने ,मा.आ.वैभवभाऊ पिचड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

यावेळी तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे, गटनेते जालींदर वाकचौरे, ॲड.वसंतराव मनकर, जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाधव, सरचिटणीस यशवंतराव आभाळे,  मच्छींद्र मंडलिक, रमेश राक्षे, युवा मोर्चा अध्यक्ष राहुल देशमुख, अरुण शेळके, बाळासाहेब वडजे, परशूराम शेळके, राज गवांदे, अमोल गोडसे,शंभू नेहे, नरेंद्र नवले, विजय पवार, सुशांत वाकचौरे, सचिन शेटे, संदीप दातखिळे, मच्छींद्र चौधरी, संदीप दातखिळे, संतोष तिकांडे, कैलास पुंडे, अमोल येवले, महेश काळे, प्रतिक वाकचौरे, सचिन गवारी, उपस्थित होते.

Web Title: agitation for the resignation of Minister Anil Deshmukh

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here