Akole: अकोले तालुक्यात रविवारी आढळले इतके रुग्ण
अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज रविवारी सुट्टी असल्या कारणाने चाचणी अहवाल प्राप्त झालेले नाही. आज केवळ तालुक्यात सहा जण बाधित आढळून आले आहेत. तालुक्याची एकूण बाधितांची संख्या ३४६६ इतकी झाली आहे.
आज प्राप्त झालेल्या अहवालात पानसरवाडी रोड अगस्ती नगर अकोले येथे ४२ वर्षीय पुरुष, सुगाव खुर्द येथे ३३ वर्षीय महिला, शेकईवाडी येथे ५५ वर्षीय महिला व ३८ वर्षीय पुरुष, राजूर येथे ६२ वर्षीय पुरुष, धुमाळवाडी येथे ७० वर्षीय महिला असे सहा जण बाधित आढळून आले आहेत.
दरम्यान अ. नगर जिल्ह्यात आज करोना आकड्याने दुसऱ्या लाटेत उच्चांकी गाठली आहे. आजची संख्या सातशे पार झाली आहे. जिल्ह्यात आज ७६५ रुग्णांनी वाढ झाली आहे. तर ५५९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Web Title: Akole Taluka New six Corona infected