Home संगमनेर संगमनेर: वऱ्हाडाचा टेम्पो पलटी होऊन अपघात

संगमनेर: वऱ्हाडाचा टेम्पो पलटी होऊन अपघात

Sangamner tempo reversed and he had an accident

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील पूर्वेकडील साकुर आश्वी रस्त्यावर पानोडी घाटात वऱ्हाड घेऊन जाणारा टेम्पो पलटी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. या अपघातात सहा जण जखमी झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, खांबे येथील विवाह सोहळा आटोपून झाल्यानंतर नवरदेवाकडील आदिवासी समाजातील वऱ्हाडी टेम्पोत बसून राहता तालुक्यातील रामपूर गावाकडे परतत असताना पानोडी घाट माथ्यावरील वळणदार रस्त्याचा अंदाज ना आल्याने भरधाव वेगात असणाऱ्या टेम्पोने रस्त्याजवळील  खड्ड्यात पलटी होत अपघात घडला.

या टेम्पोमध्ये महिला, लहान मुले व तरुण असल्याने चांगलाच गोंधळ उडाला होता. या अपघातात महिला व लहान मुले यांना मुका मार लागून जखमी झाले. या अपघाताचे वृत्त परिसरात समजताच सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरु केले.

आश्वी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमींना प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Web Title: Sangamner tempo reversed and he had an accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here