संगमनेर: शिक्षकाच्या घरावर दरोडा, तीन लाखांचा मुद्देमाल लंपास
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील मेंढवण या गावातील कार्थरवाडी परिसरात दरोडेखोरांनी एका शिक्षकाचे घर फोडले आहे.
दरोडेखोरांनी शिक्षकाच्या घरावर दरोडा टाकत ३ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मेंढवण शिवारात कार्थरवाडी या ठिकाणी शिक्षक हरिश्चंद्र बाजीराव काळे यांची वस्ती आहे. रात्रीच्यावेळी काळे कुटुंबीय झोपलेले असताना रात्री अडीच वाजेच्या सुमारास अज्ञात दरोडेखोरांनी त्यांच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. या दरोडेखोरांजवळ कुलूप तोडण्याची साहित्य होती. दरोडेखोरांनी हरिश्चंद्र काळे यांना मारहाण केली. घरातील सोन्याचे दागिने लंपास केले. त्यांनतर ते एका स्विफ्ट कार मधून पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. हरिश्चंद्र काळे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस नाईक अण्णासाहेब दातीर करीत आहे.
Web Title: Sangamner Taluka Teacher Home robbery