Home संगमनेर लग्न समारंभात गर्दी संगमनेर पोलिसांची कारवाई

लग्न समारंभात गर्दी संगमनेर पोलिसांची कारवाई

Sangamner police action at the wedding ceremony

संगमनेर | Sangamner: करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना प्रशासनाने दिलेल्या नियमांचे नागरिक पालन पालन करीत नाही. त्यामुळे प्रशासनाने कारवाईचा बडगा हाती घेतला आहे.

तालुक्यातील कुरण येथील लग्न समारंभात नियमांपेक्षा जास्त गर्दी आढळून आल्याने आयोजकाला १० हजार रुपयांचा दंड ठोठाविण्यात आला आहे.

संगमनेर तालुक्यातील कुरण येथील मुजीब शेख यांच्या घरासमोर लग्नसमारंभ सुरु होता. या समारंभासाठी १०० पेक्षा अधिक नागरिक उपस्थित होते. नियमापेक्षा अधिक गर्दी असल्याने पोलीस उपनिरीक्षक आर.ए. माळी यांनी पथकासह कारवाई केली.  या कारवाईमुळे ग्रामीण भागातील विवाह सोहळ्यातील गर्दीवर नियंत्रण येण्यास मदत होईल.

जिल्हाधिकारी यांनी दोन दिवसांपूर्वी तालुका भेट देऊन कडक कारवाईचे आदेश त्यांनी दिले आहेत. वाढत्या करोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन न आढळल्यास कारवाईस नागरिकांना सामोरे जावे लागणार आहे.  

Web Title: Sangamner police action at the wedding ceremony

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here