Home नागपूर जन्मदात्या बापानेच अल्पवयीन मुलीवर दोन वेळा केला अत्याचार

जन्मदात्या बापानेच अल्पवयीन मुलीवर दोन वेळा केला अत्याचार

Nagpur crime News:  अल्पवयीन मुलीवर जन्म दाता नराधम बापाने अत्याचार (Sexually abused).

father himself sexually abused the minor girl twice

नागपूर: बाप लेकाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना हिंगणा पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे. १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर जन्म दाता नराधम बापाने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी नराधम बापास पोलिसांनी अटक करून त्याच्याविरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्पवयीन मुलगी ३ ऑगस्ट रोजी शाळेत गेली असता दुपारी एक वाजताच्या सुमारास तिला आरोपीने घरी आणले. त्यावेळी तिची आई मजुरीच्या कामासाठी शेतात गेली होती. दुपारी घरी कुणी नसल्याचे पाहून नराधमाने तिच्यावर अत्याचार केला. घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकीही दिली.

यापूर्वीही त्याने २७ जुलैच्या मध्यरात्री सर्व झोपले असता मुलीचे तोंड दाबून अत्याचार केला. त्यावेळीही त्याने मुलीला जिवे मारण्याची धमकी दिली होती. मात्र, ३ ऑगस्ट रोजी घडलेल्या प्रकारामुळे मुलगी पूर्णपणे हादरली होती. तिने कामावरून आलेल्या आईला घडलेला प्रकार सांगितला. आईने प्रसंगावधान साधत तिला नातेवाइकांकडे नेले. नातेवाइकाना घडलेला सर्व प्रकार सांगितला. यानंतर तिने गुरुवारी (दि. ४) मुलीसह हिंगणा पोलीस स्टेशन गाठत पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. या घटनेने खळबळ उडाली आहे.  घटनेचे गांभीर्य लक्षात घेता हिंगणा पोलिसांनी नराधम आरोपीला ताब्यात घेतले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक गजानन तेलरांचे व पांडुरंग जाधव तपास करीत आहे.

Web Title: father himself sexually abused the minor girl twice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here