पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या बापाला जन्मठेप
अकोला | Akola : पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार (Rape) करणाऱ्या नराधम बापाला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. ही संतापजनक अकोल्यातील एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दित घडली होती. बापानेच आपल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करून तिला गर्भवती केले होते. अकोल्याच्या जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपाची शिक्षा सुनावली आहे.
27 नोव्हेंबर 2019 रोजी ही घटना उघडकीस आली होती. अकोल्यातील एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बापानेच वारंवार लैंगिक शोषण(sexual abuse) केले. या मुलीची तब्येत खालावल्याने तिला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी मुलगी गर्भवती असल्याची बाब उघडकीस आली. पीड़ित मुलगी अल्पवयीन असल्याने डॉक्टरानी ही माहिती बाल कल्याण समिती व पोलिसांनी दिली. त्यानंतर पिडीतेच्या जबाबानुसार तिच्या वडिलांविरुद्ध गुन्हा (Rape Crime) दाखल करण्यात आला आणि वडिलांना अटक करण्यात आली होती.
याप्रकरणी अकोला जिल्हा न्यायालयात खटला सुरु होता. या प्रकरणात पीड़ित मुलगी व तिची आईचे पूर्वी दिलेले जबाब, वैद्यकीय पुरावा, डीएनआय वैद्यकीय अहवालासह सरकारतर्फे एकूण २१ साक्षीदार तपासण्यात आले होते. दोषी ठरवून नराधम बाप खुदोबोद्दीन फकरुद्दीन याला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयात सरकार तर्फे सहायक सरकारी अभियोक्ता मंगला पांडे व किरण खोत यांनी बाजू मांडली.
Web Title: Father sentenced to life in prison for rape underage girl