Home अहमदनगर अहमदनगर: पतीने पत्नीला अ‍ॅसिड टाकून संपविण्याची धमकी अन …

अहमदनगर: पतीने पत्नीला अ‍ॅसिड टाकून संपविण्याची धमकी अन …

Ahmednagar Crime Husband threatens wife with acid

अहमदनगर | Ahmednagar Crime: पतीने पत्नीला अ‍ॅसिड टाकून संपविण्याची धमकी दिल्याप्रकरणी येथील तोफखाना पोलीस ठाण्यात पतीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पत्नी सुरेखा निलेश वाघचौरे यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना रविवार, 27 फेब्रुवारी रोजी दुपारी फिर्यादीच्या राहत्या घरी घडली.

निलेश आनंद वाघचौरे (रा. डॉक्टर कॉलनी, सिव्हील हॉस्पिटल, अहमदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे.

आरोपी निलेश वाघचौरे फिर्यादी सुरेखा वाघचौरे यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागत होता. त्यांनी पैसे न दिल्याने आरोपी शिवीगाळ करून तुझ्या नोकरीचा रुबाब मला दाखवू नको, मी तुला अ‍ॅसिड टाकून संपवून टाकील अशी धमकी दिली.तसेच लोखंडी गजाने मारहाण केली. फिर्यादीच्या मुलीला देखील लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दगडाने दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस हवालदार रणजित बारगजे करत आहेत.

Web Title: Ahmednagar Crime Husband threatens wife with acid

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here