Home अहमदनगर धक्कादायक ! बापानेच दोन लहान मुलांना  फेकले विहिरीत

धक्कादायक ! बापानेच दोन लहान मुलांना  फेकले विहिरीत

Ahmednagar News:  नराधम बापाने दोन लहान मुलांना विहिरी फेकून दिल्याची घटना समोर आली आहे.

Father threw the two children into the well

कर्जत:  तालुक्यातील आळसुंदे  गावामध्ये नराधम बापाने  दोन लहान मुलांना विहिरी फेकून दिल्याची घटना घडली आहे.  यामध्ये त्या दोन्हीही बालकांचा दुर्दैवी मृत्यू  झाला आहे. गोकुळ जयराम शिरसागर (38, रा. आळसुंदे, ता. कर्जत) असे संशयिताचे नाव आहे. यामध्ये त्याची दोन लहान मुले यामध्ये ऋतुजा (8 वर्ष) ही इयत्ता दुसरी मध्ये शिकणारी मुलगी व वेदांत (4 वर्ष) यांचा मृत्यू झाला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की,  शिरसागर याने घरापासून सहाशे मीटर अंतरावर असणार्‍या विहिरीकडे दोन्ही मुलांना उचलून पाण्यामध्ये फेकून दिले. पाण्यामध्ये फेकून देताच काही वेळात या दोन्ही बालकांचा बुडून मृत्यू झाला. यानंतर या नराधम बापाने आपण या दोन मुलांना विहिरीमध्ये फेकून दिले आहे. अशी माहिती गावातील नातेवाईकांना सांगितली. तात्काळ सर्व ग्रामस्थ घटनास्थळी धावत गेले तसेच पोलिसांना देखील याबाबत माहिती देण्यात आली. पोलीस ग्रामस्थ या सर्वांनी तात्काळ त्या दोन्हीही बालकांना पाण्याच्या बाहेर काढले. त्यांना तातडीने कर्जत उपजिल्हा रुग्णालय येथे आणले.

मात्र तत्पुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी दोन्ही बालकांना तपासून घोषीत केले. दरम्यान कर्जत पोलिसांनी नराधम बाप गोकुळ शिरसागर यास ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे चौकशी सुरू आहे. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Father threw the two children into the well

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here