Home महाराष्ट्र Suicide: वडीलांना व्हिडिओ कॉल करून धरणात उडी टाकत आत्महत्या

Suicide: वडीलांना व्हिडिओ कॉल करून धरणात उडी टाकत आत्महत्या

Father video call and commits suicide by jumping into dam

गोंदिया | Gondiya : गोंदियामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असलेल्या एका तरुणाने परीक्षेत अपयश आल्याच्या नैराश्यातून आपल्या वडीलांना व्हिडिओ कॉल करून भंडारा जिल्ह्यातील कवलेवाडा धरणात उडी टाकत आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे.

कृषिलेष राजू कनोजे वय 29 असं मयत तरुणाचे नाव आहे. कृषिलेष हा B.com पदवीधारक असुन तो स्पर्धा परीक्षा देत होता. कृशीलेष हा सन 2013 पासून स्पर्धा परीक्षा देऊन सुद्धा त्याला या स्पर्धा परीक्षेत यश येत नव्हते. त्यामुळे तो नोकरीच्या चिंतेत होता.

आज कृषिलेष हा घरी कोणाला काही न सांगता घरातील मोटरसायकलने कवलेवाडा धरणावर जावून आपल्या वडीलांच्या मोबाईलवर व्हिडिओ कॉल करून सांगितले की, ‘मी कवलेवाडा डँम येथे आत्महत्या (Suicide) करीत आहे.’ असं सांगुन मोबाईलमध्ये व्हिडीओ कॉल रेकाँर्डिग करून आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.

Web Title: Father video call and commits suicide by jumping into dam

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here