बापानेच केला पोटच्या मुलीवर अत्याचार; नगरमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना
Ahmednagar: पोटच्या मुलीवर अत्याचार (Sexual abused) नगरमधील घटना : मुलीची बापाविरोधात फिर्याद.
अहमदनगर : बापाने पोटच्या मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून बापाविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल T करण्यात आला आहे.
बापाने स्वतःच्या १४ वर्षीय मुलीवर आहे. गेल्या एप्रिलमध्ये पुणे येथे अत्याचार केला होता. त्यानंतर तो पीडित मुलीला घेऊन नगरला आला. मुलीला तिच्या मामाच्या घरी सोडायला जात असताना त्याने दुचाकी रस्त्यात थांबविली. त्यानंतर तो अल्पवयीन मुलीला घेऊन जवळच असलेल्या जंगलात गेला. तिथ त्याने पीडित मुलीचा हात पिरगळून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोघे त्यांच्या घरी गेले घरी पोहोचल्यानंतर पीडितेने घडलेल प्रकार आईला सांगितला. त्याचा राग येऊन बापाने पीडित मुलीच्या आईल व तिच्या बहिणीला जिवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटल.
Earn Money Online | सोशियल मेडिया मनोरंजनासोबत पैसे कमविण्याचा फंडा | जाणून घ्या
पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून भादंवि कलम ३७६ (२) तसेच बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्ह दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक हंडाळ करीत आहे.
Web Title: a father who sexually abused the daughter
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App