Home संगमनेर संगमनेर: बारा शेळ्या व दोन बोकडांची चोरी

संगमनेर: बारा शेळ्या व दोन बोकडांची चोरी

Sangamner Theft: अज्ञात चोरट्यांनी बारा शेळ्यांसह दोन बोकड चोरून नेल्याची घटना.

Twelve sheep and two goats were theft

घारगाव : संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील गुंजाळवाडी पठार येथून  अज्ञात चोरट्यांनी बारा शेळ्यांसह दोन बोकड चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (दि. १६ डिसेंबर) पहाटे घडली. या घटनेने पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कर्जुले पठार गावांतर्गत गुंजाळवाडी पठार येथे सदाशिव विठ्ठल भोर हे पशुपालक राहतात. नेहमीप्रमाणे त्यांनी बारा शेळ्या व दोन बोकड घराशेजारच्या गोठ्यात बांधून ठेवले होते.

Earn Money Online | सोशियल मेडिया मनोरंजनासोबत पैसे कमविण्याचा फंडा | जाणून घ्या

शुक्रवारी पहाटेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी शेळ्या व दोन बोकडांची चोरी करत पोबारा केला. सकाळी पाच वाजेच्या सुमारास भोर हे गोठ्याकडे गेले असता त्यांना गोठ्याचे कुलूप तुटलेले दिसले. आत जाऊन पाहिले असता शेळ्या व बोकड दिसून आले नाही. त्यांनी परिसरात शोध घेतला असता शेळ्या व बोकड कुठेच मिळून आले नाही. सुमारे दोन लाख दहा हजार रुपये किमतीच्या शेळ्या व बोकड चोरीला गेल्याचे भोर यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Twelve sheep and two goats were theft

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here