Home बीड शाळेच्या सहलीवरून घरी परतताच विद्यार्थ्याची आत्महत्या, कारण ऐकून बसला धक्का

शाळेच्या सहलीवरून घरी परतताच विद्यार्थ्याची आत्महत्या, कारण ऐकून बसला धक्का

Suicide News:  बीड मध्ये एका शाळकरी १५ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना.

student commits suicide on returning home from a school trip

बीड: बीडमध्ये एका 15 वर्षीय शाळकरी मुलाने आत्महत्या (Suicide) केली आहे. ही धक्कादायक आणि दुर्दैवी घटना बीडच्या आष्टी तालुक्यातील बीडसांगवी या गावात उघडकीस आली आहे. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार मुलाने पब्जी गेमच्या  (PUBG Game)  व्यसनामधून इतके टोकाचे पाऊल उचलले आहे. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथील एका माध्यमिक विद्यालयात हा विद्यार्थी शिक्षण घेतो. कृष्णाचे हे वडिल ऊसतोडणीला असल्याने आई आणि तो दोघे घरीचं असतात. काही दिवसांपूर्वी कृष्णा हा शाळेच्या सहलीसाठी गेला होता.

Earn Money Online | सोशियल मेडिया मनोरंजनासोबत पैसे कमविण्याचा फंडा | जाणून घ्या

मात्र त्यानंतर तो सहलीवरून घरी आल्यानंतर झोपला. यावेळी आई बाहेर गेल्याचे समजातच त्याने राहत्या घरात दरवाज्याला आतून कडी लावून कपड्याच्या चिंध्यांनी कडी आवळत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दरम्यान या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात आकस्मिक मुत्युची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: student commits suicide on returning home from a school trip

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here