Home क्राईम शिवसेना आमदाराविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

शिवसेना आमदाराविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

Filed a case of molestation against Shiv Sena MLA

औरंगाबाद | Aurangabad Crime: औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथील एका शिवसेना आमदाराने आपल्या कुटुंबीयांशी मिळून भावजयीस बेदम मारहाण  केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. पीडित महिला आपल्या पतीबरोबर भाजपच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याच्या कारणातून शिवसेना आमदाराने आपल्या कुटुंबीयांच्या मदतीने पीडितेस लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती.  या मारहाणीत आमदाराची भावजयी जखमी झाली होती. या प्रकरणी शिवसेना आमदाराबरोबरच १० जणांविरोधामध्ये पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आता याप्रकरणी पोलिसांनी या मारहाणी प्रकरणी विनयभंगाचा (Molestation) गुन्हा देखील दाखल केला आहे. रमेश बोरनारे (MLA Ramesh Bornare) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. तो शिवसेना आमदार आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसाअगोदर वैजापूर तालुक्यात सटाणा येथे भाजपच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले होते. हे उद्घाटन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आरोपी शिवसेना आमदार रमेश बोरनारे यांच्या चुलत भावाची पत्नी जयश्री दिलीप बोरनारे आपल्या पतीबरोबर उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये जयश्री यांनी विरोधी पक्षातील नेत्याचा सत्कार केला होता.

या कार्यक्रमावरुन आमदार बोरनारे यांनी कुटुंबीयांच्या मदतीने जयश्री यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आहे. यावेळी आरोपींनी पीडितेला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. या बेदम मारहाणीमध्ये फिर्यादी जयश्री यांच्या पाठीवर आणि शरीरावर मारहाण केल्याचे जखमा वन होते. या मारहाणी प्रकरणी आमदार बोरनारे याच्याबरोबर १० जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. पण या मारहाणी प्रकरणामध्ये अखेर शिवसेना आमदार रमेश बोरनारे यांच्यावर विनयभंगाचा (Molestation) गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. सत्ताधारी पक्षातील आमदारानेच आपल्या भावजयीला मारहाण केल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: Filed a case of molestation against Shiv Sena MLA

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here