एकाच घरात पती-पत्नीसह मुलाचा मृतदेह आढळल्यानं खळबळ, आत्महत्या की घातपात?
Breaking News | Nagpur Crime: एकाच घरात तिघांचे मृतदेह (Dead body) आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
नागपूर: नागपूर मधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मौदा तालुक्यामधील शांतीनगर तुमान गावात तीन जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. एकाच घरात तिघांचे मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एकाच कुटूंबातील पती, पत्नी आणि मुलाचा मृतांमध्ये समावेश आहे.
अरोली पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे. श्रीनिवास इळपुंगटी (वय ५८ वर्षे), पद्मालता इळपुंगटी (वय ५४) आणि मुलगा वेंकट इळपुंगटी (वय २९) अशी मृतांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, इळपुंगटी कुटूंबाचा राईस मिलचा व्यवसाय आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शव विच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहे. एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केली कुणी हत्या केली,याचा तपास पोलीस करत आहेत.
मौदा तालुक्यातील शांतीनगर तुमान गावात इळपुंगटी कुटुंबीय गेल्या अनेक वर्षापासून राहत होतं. नेहमी सकाळी लवकर उठणारे हे कुटूंबीय गुरुवारी सकाळी बराच वेळ झाला तरी कोणीच बाहेर न आल्याने शेजाऱ्यांनी त्यांना आवाज दिला. मात्र आतून काहीच प्रतिसाद न आल्याने शेजाऱ्यांनी घरात डोकावून पाहिले असता सर्वांना धक्का बसला. घरात पती-पत्नी व त्यांचा २९ वर्षाच्या मुलाचा मृतदेह पडला होता. त्यांनी तत्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली.
Web Title: finding dead body of husband and wife and child in same house, suicide or accident
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study