Home अकोले अकोले: बिबट्याचा महिलेवर हल्ला, चार तासांत जेरबंद

अकोले: बिबट्याचा महिलेवर हल्ला, चार तासांत जेरबंद

Breaking News | Rajur: वृद्ध महिलेवर हल्ला करणाऱ्या बिबट्यास जेरबंद करण्यास राजूर वनविभागास यश.

Bibatya attacks woman, jailed within four hours

राजूर : अकोले तालुक्यातील माळेगाव येथील महिलेवर घरात घुसून बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. यामध्ये त्या वृद्ध महिला जखमी झाल्या असून बिबट्याला जेरबंद करण्यात राजूर वनविभागाला यश आले आहे.

 बिबट्याने येसूबाई लालू सुकटे (वय ६०) या वृद्ध महिलेवर हल्ला केला अन  बिबट्यास जेरबंद करण्यास राजूर वनविभागास चार तासांत यश आले आहे.

राजूर वनपरिमंडळ क्षेत्रातील माळेगाव या खेडेगावात बुधवारी (दि. १३) दुपारी दोनच्या सुमारास अंदाजे दहा वर्षे असणाऱ्या बिबट्याने अचानक मानव वस्तीत प्रवेश केला. या गावातील कौलारू घरात घुसून त्याने वृद्ध महिला येसूबाई यांच्यावर अचानक हल्ला करून त्यांना जखमी केले. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी राजश्री साळवे आपल्या कर्मचाऱ्यांसमवेत घटनास्थळी दाखल झाल्या. वस्तीत आलेला बिबट्या तेथील एका पडक्या घरात आश्रयास बसला असल्याची खात्री केली. त्यानंतर सदरचे घर जाळी लावून बंदिस्त करण्यात आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत साळवे यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधत संगमनेर येथील रॅपिड रिस्पॉन्स टीमला पाचारण करण्यात आले.

दरम्यान, जखमी येसूबाईला उपचारास राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रथमोपचार करून या महिलेस नाशिक येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. वनपरिक्षेत्र अधिकारी राजश्री साळवे यांच्या समवेत वनपाल योगेश डोंगरे, वनरक्षक राजूर शंकर बेनके, संगमनेर रॅपिड रिसपॉन्स टीम वनरक्षक संतोष पारधी, संतोष बो-हाडे यांच्यासह राजूर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने हा बिबट्या जेरबंद केला. यामुळे माळेगाव ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला.

Web Title: Bibatya attacks woman, jailed within four hours

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here