Home अकोले सुगाव दुर्घटनेबाबत अकोले तहसीलसमोर ठिय्या आंदोलन

सुगाव दुर्घटनेबाबत अकोले तहसीलसमोर ठिय्या आंदोलन

Breaking News | Akole: सुगाव बुद्रुक येथील दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तहसीलदारांवर प्रश्नांचा भडीमार तर पालकमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी.

Bodies of two drowned in Pravara river found news

अकोले: तालुक्यातील सुगाव बुद्रुक येथील दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सुगाव येथील युवकाच्या कुटुंबास भरीव आर्थिक मदत करावी. तसेच या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा द्यावा. या मागण्यांसाठी सोमवारी (दि. २७ मे) विविध सामाजिक व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. याप्रकरणी निवेदन देण्यासाठी गेलेले असताना तहसीलदार उपस्थित नसल्याने संतप्त कार्यकत्यांनी तहसील कार्यालयापुढे ठिय्या आंदोलन केले. तर तीन तासांनंतर कार्यालयात आलेल्या तहसीलदारांवर कार्यकर्त्यांनी भडीमार केला.

अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक येथे प्रवरा नदीपात्रात पोहताना बुडालेल्या अर्जुन जेडगुले या तरुणाच्या मृतदेहाचा शोध घेण्याच्या प्रयत्नात राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे तीन जवान व स्थानिक तरुणाचा बळी गेला. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण राज्य हळहळले. त्यानंतर आता प्रशासनावर विविध स्वरूपाचे आरोप सुरु झाले आहेत. सोमवारी सकाळी १० वाजता सर्वपक्षीय कार्यकर्ते निवेदन देण्यासाठी तहसील कार्यालयात आले होते, परंतु तहसीलदार सिद्धार्थ मोरे हे कार्यालयात उपस्थित नव्हते. परिणामी कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयाच्या आवारातच ठिय्या आंदोलन सुरू केले. तहसीलदार मोरे हे तब्बल तीन तासांनंतर कार्यालयात पोहचले. या ठिय्या आंदोलनात एक ना अनेक प्रश्नांचा भडीमार करत आपत्ती व्यवस्थापन पथकाला घटनास्थळी पाचारण कोणी केले होते? हे शोधणे त्यांचे काम आहे का? तर पथकाचे मृतदेह शोधणे की जिवंत माणसाला आपत्तीतून वाचवणे हे काम आहे? नेत्यांनी पाणी बंद करणे गरजेचे होते. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. या घटनेमुळे मृत झालेल्यांचे घर उद्ध्वस्त झाले आहे. त्या परिवाराला मदत व्हावी तसेच गणेश देशमुख याच्या  कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीमध्ये सामावून घ्यावे. शासनाने या घटनेबाबत केलेल्या पाठपुराव्याची माहिती द्यावी. तहसीलदारांनी आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण करण्याची मागणी केली. परंतु जलसंपदा विभागाकडे प्रवरेला सोडलेले पाणी तात्पुरते बंद करण्याची मागणी का केली नाही? तहसीलदार पालकमंत्र्यांच्या दबावाखाली होते का? असे प्रश्न उपस्थित केले.

पथकाला घटनास्थळी पाचारण कोणी केले होते? हे शोधणे त्यांचे काम आहे का? तर पथकाचे मृतदेह शोधणे की जिवंत माणसाला आपत्तीतून वाचवणे हे काम आहे? नेत्यांनी पाणी बंद करणे गरजेचे होते. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. या घटनेमुळे मृत झालेल्यांचे घर उद्ध्वस्त झाले आहे. त्या परिवाराला मदत व्हावी तसेच गणेश देशमुख याच्या उपस्थित केले.

संकटकाळात दंडाधिकारी आपले काम सोडून राजकारण करत असून तहसीलदारांनी या घटनेत जबाबदारी पाळली गेली नाही. आचारसंहितेच्या काळात पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. या घटनेला पालकमंत्री जबाबदार असून मृताच्या कुटुंबाला केलेली मदत तुटपुंजी आहे. राष्ट्रीय कामात मदत करणाऱ्या गणेश देशमुखच्या कुटुंबाला मोठी मदत केली पाहिजे. तसेच चार जणांच्या कुटुंबाला भरीव मदत करावी. अन्यथा जनआक्रोश होईल. याशिवाय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी केली.

२६ दिवस पाण्याचे आवर्तन चालले. डोळ्यासमोर पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. जिवंत लोकांना बाहेर काढण्याचे की मृत लोकांना बाहेर काढणे आपत्ती पथकाचे काम असते याचा खुलासा हवा. प्रत्येक तालुक्यात आपत्ती व्यवस्थापन केंद्र उभे केले पाहिजे, अशी मागणी माकप नेते डॉ. अजित नवले, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश नवले, अगस्ति कारखान्याचे संचालक प्रदीप हासे, सामाजिक कार्यकर्ते संदीप दराडे, देखरेख संघाचे माजी अध्यक्ष बबन तिकांडे, माकप नेते कॉ. तुळशीराम कातोरे, संभाजी ब्रिगेडचे राज्य समन्वयक डॉ. संदीप कडलग, शेतकरी पुत्र सुरेश नवले, खरेदी-विक्री संघाचे संचालक निलेश तळेकर, युवासेनेचे तालुकाप्रमुख गणेश अस्वले, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विजय आवारी, सेनेचे कार्यकर्ते केतन भांगरे, संकेत लांडे आदी कार्यकर्त्यांनी केली.

Web Title: protest was held in front of Akole Tehsil regarding the Sugao incident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here