Home अहमदनगर संगमनेर तालुक्यात तब्बल पाच टन गोमांस पकडले

संगमनेर तालुक्यात तब्बल पाच टन गोमांस पकडले

Breaking News | Sangamner: संगमनेर तालुका पोलिसांची कारवाई; साडेबारा लाखांचा मुद्देमाल जप्त.

many as five tonnes of beef were caught in Sangamner taluka

संगमनेर: तालुक्यातील कसारे गावच्या शिवारातील जांभुळवाडी फाटा ते विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर तब्बल पाच टन गोमांसाची वाहतूक करणारा ट्रक संगमनेर तालुका पोलिसांनी पकडला. सदर कारवाई सोमवारी (दि. २७ मे) सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास करुन १२ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत तालुका पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, जाकीरखान नसीरखान पठाण (वय ४९, रा. मोगलपुरा, संगमनेर) व अय्युब मेहबूब कुरेशी (वय ५३, रा. कुरणरोड, इस्लामपुरा, संगमनेर) हे दोघे आयशर ट्रकमधून (क्र. एमएच. १७, बीवाय. ७८२४) गोमांस घेऊन जात असल्याची माहिती गुप्त खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानुसार पोहेकॉ. राजेंद्र पालवे आणि दत्तात्रय बडधे यांच्या पथकाने सापळा लावून हा ट्रक पकडला. या कारवाईत पोलिसांनी ७ लाख ५० हजार रुपयांचे पाच टन गोमांस आणि ५ लाख रुपयांचा ट्रक असा एकूण १२ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोहेकॉ. दत्तात्रय बडधे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील दोघांवर तालुका पोलिसांत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. डी. जी. दिघे हे करत आहे.

Web Title: many as five tonnes of beef were caught in Sangamner taluka

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here