Home Accident News संगमनेर: कंटेनरच्या धडकेत बुलेटवरील दोघे ठार

संगमनेर: कंटेनरच्या धडकेत बुलेटवरील दोघे ठार

Breaking News | Sangamner Accident: बुलेट दुचाकीला भरधाव कंटेनरने मागून धडक दिल्याने बुलेटस्वारासह मागे बसलेला एक असे दोघे गंभीर जखमी तरुण ठार.

two on the bullet were killed in the collision with the container

संगमनेर: बुलेट दुचाकीला भरधाव कंटेनरने मागून धडक दिल्याने बुलेटस्वारासह मागे बसलेला एक असे दोघे गंभीर जखमी तरुण ठार झाले. रविवारी रात्री १०:१५ वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. प्रशांत रविंद्र भुजबळ (३३) व गोरख सयाजी पर्वत (४०, दोघे रा. निंबाळे, ता. संगमनेर) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. अपघाताची माहिती पोलिसांना न देता कंटेनरसह पसार झाला.

अपघातातील मृत (एम. एच. १४ एच. टी. ५००६) क्रमांकाच्या बुलेटवरून कोल्हार-घोटी राज्य मार्गावरुन संगमनेर-लोणी रस्त्याने घरी जात होते. लोणी रस्त्यावर समनापूर फ्लॉवर मार्केटजवळ अज्ञात कंटेनर चालकाने बुलेटला मागून जोराची धडक दिली. या अपघातात बुलेटवरील दोघे गंभीर जखमी झाले. आसपासच्या नागरिकांनी त्यांना तत्काळ उपचारासाठी घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात हलविले, मात्र डॉक्टरांनी दोघांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

याप्रकरणी सोमनाथ भुजबळ (रा. निंबाळे) यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अज्ञात कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पो. उ. नि. पाटील पुढील तपास करीत आहे.

Web Title: two on the bullet were killed in the collision with the container

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here