Home अहमदनगर अहमदनगर: नदीपात्रात तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ

अहमदनगर: नदीपात्रात तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ

finding the Dead body of a young man in a river basin

Kopargaon | कोपरगाव:   कोपरगाव शहरातील खडकी येथे राहत असलेला केतन बापू कुटे (वय 23) हा तरुण  दि.13 फेब्रुवारीपासून घरातून निघून गेला होता. तो बेपत्ता होता. अखेर त्याचा मृतदेह (Dead Body) दि. 16 फेब्रुवारी रोजी कोपरगाव शहरालगत गोदावरी नदीपात्रात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सदर तरुणाने मोठ्या पुलावरून उडी मारून आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.

याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कोपरगाव शहरातील खडकी येथील केतन बापू कुटे हा तरुण भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत होता. तो रविवारी घरातून निघून गेला होता. दुसर्‍या दिवशी सोमवारी त्याच्याकडील दुचाकी ही गोदावरी नदीच्या मोठ्या पुलावर आढळून आली होती. दरम्यान त्याचा मृतदेह (Dead Body) 16 फेब्रुवारी रोजी कोपरगाव शहरालगत गोदावरी नदी पात्रात आढळून आला आहे.

सदर मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला असून याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अमोल बापू कुटे यांच्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: finding the Dead body of a young man in a river basin

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here