Home अहमदनगर संगमनेर: अल्पवयीन मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्याने उघडकीस

संगमनेर: अल्पवयीन मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्याने उघडकीस

Sangamner Crime Abuse of a minor girl, revealed to be pregnant

Sangamner Crime | संगमनेर: संगमनेर तालुक्यातील पठारभागातून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पठार भागात अल्पवयीन मुलीला जीवे व आई वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर शारीरिक अत्याचार केले आहे. मुलगी तीन महिन्याची गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. पिडीत अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून घारगाव पोलीस ठाण्यात मयूर मोहन कौटे याच्यावर बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

याबाबत अधिक माहिती अशी की, सदरची घटना पठारभागातील एका आश्रम शाळेच्या आवारात घडली आहे. आरोपी मयूर मोहन कौटे याने सदर अल्पवयीन मुलीला धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. या कृत्याला तिने विरोध केला असता त्या नराधमाने तिच्या आई-वडीलांना जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर इच्छेविरुध्द शारीरिक अत्याचार (sexually abusing) केले व ही घटना कोणास सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या नराधमाने शाळेच्या परिसरात नेवून गेल्या चार महिन्यांपासून सातत्याने तिच्यावर अत्याचार केले. या प्रकारातून त्या मुलीला पोटदुखीच्या त्रास होऊ लागल्याने तिच्या आई-वडीलांनी तिला दवाखान्यात नेले असता ती तीन महिन्यांची गरोदर असल्याचे समोर आले.

याबाबत अल्पवयीन मुलीच्या वडीलांनी घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यावरुन घारगाव पोलिसांनी नराधम मयूर मोहन कौटे (वय 27) याच्यावर भारतीय दंड संहितेचे कलम 396 (2) (।) (एन), 506 व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणार्‍या कायद्याचे (पोस्को) कलम 4 नुसार गुन्हा (Crime) दाखल करुन त्या नराधमास अटक केली आहे.

Web Title: Sangamner Crime Abuse of a minor girl, revealed to be pregnant

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here