Home अकोले अकोले: कोटमारा धरणात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

अकोले: कोटमारा धरणात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

finding the Dead body of an unknown Isma in Kotmara Dam

Akole | अकोले: तालुक्यातील शेवटचे टोक आणि संगमनेर तालुक्याच्या सीमेवर असलेले पठार भागातील जाचकवाडी गावच्या हद्दीत असलेल्या कोटमारा धरणात साधारण  पन्नास वर्षीय अज्ञात इसमाचा मृतदेह (Dead Body) धरणाच्या पाण्यावर तरंगताना आढळून आल्याने परिसरात धावपळ आणि खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी  की, सोमवार दिनांक ४ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजून ३० मिनिटाच्या दरम्यान बोट्याहुन बेलापुरच्या दिशेने येत असताना  एक ट्रॅक चालकाला कोटमारा धरणाच्या पाण्यावर एक अज्ञात इसमाचा मृतदेह तरंगताना आढळून आला असता.त्यांनी पुढे भोजदरी फाट्यावर बसलेले जाचकवाडी गावचे नागरिक सुहास फापाळे, बाळासाहेब सहाने , करीम फापाळे यांना सदर घटनेची माहिती दिली. सदर नागरिकांनी घटनेची शाहनिशा करण्यासाठी कोटमारा धरणावर धाव घेतली असता त्यांना देखील पुरुष जातीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. सदर घटनेची माहिती सुहास फापाळे यांनी जाचकवाडी गावचे पोलिस पाटील शिवाजी फापाळे यांना दिली.तसेच पोलिस पाटील शिवाजी फापाळे यांनी घटना स्थळी येत पाहणी करून अकोले पोलिस स्टेशनला खबर दिली.

या दरम्यान पोलिस पाटील शिवाजी फापाळे यांनी घटना स्थळाची पाहणी करत असताना त्यांना एक हिरो कंपनीची एम एच १४ डी यु ६००७ क्रमांकाची संशयित मोटरसायकल धरणाच्या कडेला चावी लावलेल्या स्थितीत उभी दिसली .गाडी क्रमांकाची माहिती घेऊन सदर गाडी मालक यांचे नातेवाईकांना संपर्क केला असता. सदर गाडीमालकाचे नातेवाईक घटना स्थळी आले. आणि त्यांनी मृतदेह पाहून  ओळख पटली असल्याचे सांगितले. सदर व्यक्ती ५० वर्षीय ज्ञानेश्वर लक्ष्मण सोनवणे रा. चाळकवाडी ता. जुन्नर जिल्हा पुणे येथील रहिवासी असून दि.३ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेपासून घरी आले नसल्याने त्यांचे नातेवाईक त्यांचा शोध घेत असल्याचे नातेवाईकांनी सांगीतले.

दुपारी तीन वाजता अकोले पोलिस स्टेशनचे पोलिस घटना स्थळावर पोहचले असता विठ्ठल शरमाळे,पोलिस तळपे, पोलीस पटेकर यांनी घटना स्थळाचा पंचनामा करत मृतदेह पाण्याबाहेर काढून शवविच्छेदनासाठी खाजगी रुग्णवाहिकेतून अकोले येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.तसेच सदर व्यक्तीचे नातेवाईक विजय सोनवणे यांचे खबरी नुसार अकोले पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या दरम्यान सदर व्यक्ती या परिसरात का आली असावी ? .या व्यक्तीने आत्महत्या केली की अन्य काही  याचा तपास अकोले पोलिस स्टेशन करत आहे.

Web Title: finding the Dead body of an unknown Isma in Kotmara Dam

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here