Home पुणे Bus Fire:  बसच्या केबिनमध्ये लागली आग, चालकाने प्रसंगावधान राखलं म्हणून…

Bus Fire:  बसच्या केबिनमध्ये लागली आग, चालकाने प्रसंगावधान राखलं म्हणून…

Bus Fire: अप्पर डेपो बस स्थानक बसला केबिनमध्ये आग लागल्याने खळबळ, जवानांच्या अथक परिश्रमाने आग आटोक्यात, कोणही जखमी नाही, आगीचे कारण समजू शकले नाही.

fire broke out in the bus cabin

पुणे:  पुण्यातील नवले पुलावरील वाहनाच्या अपघाताची घटना ताजी असताना आता  पुण्यातील अप्पर डेपो बसस्थानकाजवळ बसला आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

पुण्यातील अप्पर डेपो बसस्थानक येथे बसला आग लागल्याची घटना घडली. या बसला आग लागल्याची माहिती होताच गंगाधाम अग्निशमन केंद्र येथून अग्निशमन वाहन रवाना झाले. घटनास्थळी पोहोचताच जवानांनी बसच्या पुढील बाजूस इंजिनच्या ठिकाणी पेट घेतल्याचे निदर्शनास येताच आगीवर पाण्याचा मारा सुरू केली. जवानांच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं.

इयत्ता 8 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी तसेच सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांकरीता अतिशय उपयुक्त असे इंग्रजी व्याकरण अभ्यासण्यासाठी आवश्यक असे मोफत स्टडी मटेरीअल….  

पुण्यातील अप्पर डेपो डेपो बसस्थानक येथे बसच्या केबीनला अचानाक आग लागली. डेपो ते स्वारगेट मार्गाच्या या बसचे बसचालक विश्वास किलजे यांनी प्राथमिक स्तरावर प्रसंगावधान राखला. त्यांनी बसस्थानकावर उपलब्ध असलेले दोन अग्निरोधक उपकरण वापरून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवानांनी येऊन आगीवर नियंत्रण मिळवलं.

घटनेवेळी बसमध्ये कोणीही प्रवासी नव्हते. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र, आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

Web Title: fire broke out in the bus cabin

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here