Home पुणे लग्नाच्या अवघ्या ६ दिवसानंतर तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, पत्नीला मानसिक धक्का

लग्नाच्या अवघ्या ६ दिवसानंतर तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, पत्नीला मानसिक धक्का

Death: मृतदेह ज्या मंडपात सत्यनारायणाची पूजा घातलेली होती. त्याच मंडपात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला. धक्क्याने हर्षदा चे स्वप्न पूर्णतः उध्वस्त झाले.

Young man death of heart attack just 6 days after marriage

माळेगाव : लग्न म्हंटलं घरात आनंदाचा व उत्साहाचं वातावरण असते असंच वातावरण माळेगाव मधील माळेगाव कारखान्याचे निवृत्त कर्मचारी अनिल पांडुरंग येळे यांच्या घरी त्यांच्या मुलाच्या लग्नाच्या निमित्ताने होते. लग्न समारंभाच्या निमित्ताने नातेवाईक व मित्रपरिवारच्या साक्षीने शनिवार दिनांक 19 रोजी दुपारी लग्न समारंभ पार पडला. सगळं कसं या नव दाम्पत्याने पाहिलेल्या स्वप्नांप्रमाणे चालू होतं. परंतु नियतीच्या मनात काही वेगळे चालू होतं आणि गुरुवारी पहाटे नवरा मुलगा सचिन उर्फ बबलू अनिल येळे (वय 25 रा माळेगाव) याचा याला पहाटे एक वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटका आला

यानंतर नातेवाईकांनी त्वरित बारामती येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचारासाठी दाखल केले. परंतु डॉक्टरांनी नवरा मुलगा सचिन मृत (Death) पावल्याचे सांगितले. ही बातमी माळेगाव परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि एकच खळबळ उडाली. सर्वांची मने सुन झाली. सचिनच्या घराकडे नातेवाईकांचा व मित्रपरिवाराचे लोंढेच्या लोंढे येऊ लागले. सचिनचा मृतदेह ज्या मंडपात सत्यनारायणाची पूजा घातलेली होती. त्याच मंडपात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला. यावेळी सचिनच्या आई-वडिलांसह नातेवाईकांचा मित्रपरिवारचा व हर्षदाचा आक्रोश उपस्थिथांचे यांचे हृदय पिळवटून टाकणारा होता.

इयत्ता 8 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी तसेच सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांकरीता अतिशय उपयुक्त असे इंग्रजी व्याकरण अभ्यासण्यासाठी आवश्यक असे मोफत स्टडी मटेरीअल….  

यावेळी नवरी मुलगी हर्षदाचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. हर्षदाच्या हातामधील चुडा मेहंदी व अंगावरील हळद तशीच होती नऊ संसाराचे स्वप्न पाहिलेला या नवोदम्पत्यांमधील सचिनच्या मृत्यूने हर्षदाला मानसिक धक्का बसलेला आहे. या धक्क्याने हर्षदा चे स्वप्न पूर्णतः उध्वस्त झालेले आहे. हर्षदाची मानसिक अवस्था खूपच वेदनादायी असून तिला पुढील आयुष्य जगण्याचा मोठा यक्ष प्रश्न निर्माण झालेला आहे.

Web Title: Young man death of heart attack just 6 days after marriage

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here