Home औरंगाबाद पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळीबार, मुलीला पळवून नेत….

पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळीबार, मुलीला पळवून नेत….

एका कुटुंबावर गावठी पिस्तुलाने गोळी झाडल्याची  (Firing) थरारक घटना.

Firing at a young man out of animosity, abducting a girl

छत्रपती संभाजीनगर: पूर्ववैमनस्यातून एका कुटुंबावर गावठी पिस्तुलाने गोळी झाडल्याची थरारक घटना मंगळवारी रात्री रांजणगावात घडली. कुटुंबीयांनी प्रसंगावधान राखत दुकानाचे शटर बंद केल्याने गोळी शटरच्या आरपार जाऊन अर्जुन राजू काळे (२२) याच्या गुडघ्याला लागली. हल्लेखोर तरुण दुचाकीवर पसार झाले.

रांजणगाव शेणपुंजी येथील दीपाली अनिल काळे हीस श्रावण सुरेश पिंपळे (२५, रा. नायतळे ता. निफाड, जि. नाशिक) याने पळवून नेत तिच्यासोबत लग्न केले होते. या घटनेनंतर काळे व पिंपळे कुटुंबीयांत वाद सुरू आहे. मंगळवारी रात्री श्रावणने दीपालीचा चुलत भाऊ धरम यास फोन करून वाद घातला. त्यानंतर काही वेळाने धरमचा भाऊ अर्जुन काळे, बहीण रोहिणी, वहिनी दिव्या व अर्जुनची आई घरासमोर ओट्यावर गप्पा मारत बसले होते. दरम्यान, श्रावण व त्याचा एक साथीदार दुचाकीवर तेथे आले. श्रावण दुचाकी उभी करून कमरेला लावलेले गावठी पिस्तूल काढून त्यात गोळ्या भरू लागला.

Web Title: Firing at a young man out of animosity, abducting a girl

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here