Home नागपूर आई रागावल्यामुळे तरुणीची आत्महत्या

आई रागावल्यामुळे तरुणीची आत्महत्या

Nagpur News:  आईच्या ओरडण्याचा राग अनावर झाल्याने मुलीने घरात गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची  घटना.

Youth Woman commits suicide due to angry mother

नागपूर : आईच्या ओरडण्याचा राग अनावर झाल्याने मुलीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची  घटना वाडीत उघडकीस आली. प्रीती अशोकराव हर्षे (२८) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.

प्रीती हर्षे ही आई-वडिलांसह अमरनगरात राहत होती. तिला तीन विवाहित बहिणी आहेत. ती पदवीधर असून झोन चौकातील एका स्टेशनरीच्या दुकानात काम करते. गेल्या काही दिवसांपासून प्रीती आईला घरकामात मदत करीत नव्हती. तसेच ती सकाळी उशिरापर्यंत झोपत होती. त्यामुळे तिची आई वारंवार ओरडत होती. गुरुवारी सकाळी प्रीती १० वाजले तरीही झोपेतून उठली नव्हती. त्यामुळे तिच्या आईने पुन्हा तिला रागावले. आईच्या ओरडण्याचा राग अनावर झाल्याने प्रीतीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Youth Woman commits suicide due to angry mother

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here