Home महाराष्ट्र धक्कादायक! जिल्हा परिषदेच्या आवारात भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार

धक्कादायक! जिल्हा परिषदेच्या आवारात भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार

Hingoli Crime News:  दुचाकीवर आलेल्या दोघांकडून भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांवर गोळीबार (Firing), हल्लेखोर पसार.

Firing on an office bearer of BJP Yuva Morcha in Zilla Parishad premises

हिंगोली: छत्रपती संभाजीनगरमध्ये गोळीबाराची घटना घडली होती आता हिंगोलीतही गोळीबाराची घटना घडली आहे. हिंगोलीतील जिल्हा परिषदेच्या आवारात ही गोळीबाराची घटना घडली आहे. दुचाकीवर आलेल्या दोघांकडून भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांवर गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  हिंगोलीत  भाजपचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी हिंगोलीच्या जिल्हा परिषदे पुढे पप्पू चव्हाण यांच्यावर समोरासमोर गोळीबार केला आहे.

या घटनेत पप्पू चव्हाण हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पाठीला मोठी इजा झाली आहे. दरम्यान या घटनेनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले आहेत. तसेच पोलीस या हल्लेखोराचा शोध घेत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Web Title: Firing on an office bearer of BJP Yuva Morcha in Zilla Parishad premises

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here